Chinchwad : चिंचवडमध्ये चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील बिजलीनगर परिसरात चार लाख 10 हजार रुपयांची घरफोडी झाली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) दुपारी उघडकीस आला.

विजयकुमार जनार्दन पोतदार (वय 52, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला कुलूप लावून फिर्यादी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी बाहेरगावी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून 11 तोळे वजनाचे चार लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता फिर्यादी गावाहून परत आले असता हा प्रकार उकडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.