Chinchwad News : चिंचवडेनगर मध्ये भर दिवसा घरफोडी

एमपीसी न्यूज – वाल्हेकर वाडी चिंचवड येथे अज्ञातांनी (Chinchwad News) घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी एक ते सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या कालावधीत घडली.

 

मल्लिकार्जुन शिवदास भंगे (वय 32, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर कोर्टात याचिका

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भंगे यांचे घर कुलूप लाऊन बंद असताना भर दिवसा अज्ञातांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.(Chinchwad News) घरातून 50 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.