Chinchwad : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आवास योजना, स्मार्ट सिटीच्या कामाचे ‘ई-भूमिपूजन’ 

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज (बुधवारी)’ई-भूमिपुजन’ करण्यात आले. याशिवाय पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे देखील उद्‌घाटन त्यांचे हस्ते करण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप,  महेश लांडगे, गौतम चौबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

महापालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्याअंतर्गत च-होलीत (1442 सदनिका), रावेत (934),  मोशी – बो-हाडेवाडी( 1288), आकुर्डी (500 )आणि पिंपरी (300)या कामाचे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट स्किवॉस्क, व्हेरियेबेयल मेसेज डिस्पले सोल्यूशन याबाबात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम, अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईनअंतर्गत शहरातील अंतर्गत रस्ते विकसित करण्याचे कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like