Chinchwad : हृदयरोग कसा टाळाल ?

हृदयरोग हा सर्वात जास्त मृत्यूला कारणीभूत असणारा आजार झाला आहे. शरीराची हानी करणारा धोकादायक आजार म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत 17.5  मिलियन लोक या आजाराला बळी पडले आहेत. हृदयरोग टाळण्यासाठी काय करता येईल त्याचा उहापोह आपण थोडक्यात पाहू. 

# धुम्रपान- धुम्रपान टाळल्यास हृदयरोगापासून सुटका होण्यास मदत होईल. धुम्रपानामुळे हृदयाच्या नसामध्ये कडकपणा येतो व त्यामुळे रोग वाढतो.

# व्यायाम- नियमितपणे व्यायाम केला तर हृदयरोग टाळण्यासाठी खूप मदत होते. हृदय ठणठणीत राहण्यासाठी प्रत्येकाने किमान १०००० पाऊले रोज चालले पाहिजे.

# वजन नियंत्रण – जेवढे वजन जास्त तेवढे हृदयरोग होण्याची संभावना जास्त. वजन नियंत्रित ठेवले तरी हृदयरोग टाळता येऊ शकतो. त्यासाठी सर्व गुणानी युक्त असे योग्य आहाराचे सेवन केले पाहिजे. कमी चरबी, बिना साखरयुक्त आहार, गरजे नुसार फळे-पालेभाज्या यांचे नियमित सेवन केले पाहिजे.

# फायबर युक्त आहार- ओट,कडधान्य, फळे, शाकाहार याचे सेवन केले पाहिजे. फायबरयुक्त आहाराने पचन सुधारते व आवश्यक शक्ती मिळते. यामुळे योग्य शौच होण्यास फायदा होतो.
# फॅट्स – सॅच्युरेटेड फॅटची मात्रा कमी कमीत ठेवावी. जास्त प्रमाणात हे पदार्थ खाण्यात आले तर रक्तातील चरबीची मात्रा वाढते.
# रक्तदाब- रक्तदाब योग्य ठेवण्यासाठी मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, शक्यतो मीठ टाळलेले चांगले.

आयुष्याची उर्जा वाढवा सुदृढ हृदयाने .

डॉ.विशाल मिसाळ(एम.डी.)
9226932435 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.