BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मोफत कान तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व डॉ. अरविंद पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7) श्री स्वामी समर्थ मंदिर विरंगुळा केंद्र येथे मोफत कान तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात 5 वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिक पर्यंतच्या वयोगटातील 150 लोकांनी सहभाग घेतला. शिबिरासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, डॉ. अरविंद पाटील, सुरेश सीड, मंगेश पाटील, प्रा. हरिनारायण शेळके, राजाराम सावंत, अर्चना तोंडकर, सारिका रिकामे, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, कैलास मुळे, शरद पवार, रेखा शेळके व डॉ पाटील यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3