Chinchwad : कामवाली बाई न आल्यावरून पती-पत्नीचे भांडण; पत्नीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – कामवाली बाई कामासाठी आली नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नीने घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

मेघा संतोष पाटील (वय 35, रा. मानस कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. तर त्यांचे पती डॉक्टर आहेत. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. या अतिसुशिक्षित दाम्पत्याचे कामवाली बाई घरकामासाठी आली नसल्याच्या कारणावरून शनिवारी कडाक्याचे भांडण झाले.

त्यानंतर, रागाच्या भरात मेघा यांनी राहत्या घराच्या गॅलरीमधून खाली उडी मारली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.