Chinchwad: आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पळवले; आज पहाटेची घटना

Chinchwad: ICICI Bank ATMs snatched सायरन वाजत असतानाही चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकले आणि धूम ठोकली. सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला.

एमपीसी न्यूज- एटीएम मशीनला दोरखंड बांधून ओढून काढले आणि एटीएम पिकअपमध्ये टाकून पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि.9) पहाटे चिंचवडमधील थरमॅक्‍स चौक येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.

थरमॅक्‍स चौक येथील नवमी हॉटेलजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे चार ते पाच चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून काढले. एटीएम हालल्यामुळे एटीएम सेंटरमधील धोक्‍याची सूचना देणारा सायरन वाजला.

सायरन वाजत असतानाही चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकले आणि धूम ठोकली. सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. पोलीस नियंत्रण कक्षाने आसपासच्या सर्व पोलिसांना याबाबत सूचना दिली. मात्र ही पिकअप व्हॅन कोणाच्याही हाती लागलेली नाही.

या एटीएममध्ये सात जून रोजी दहा लाखांची रोकड भरण्यात आली होती. त्यापैकी एमटीएममध्ये किती रक्‍कम होती, याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, 5 लाख 71 हजार रुपये शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.