Chinchwad : बेकायदेशीर बांधकामांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ

एमपीसी न्यूज – महापालिका आणि प्राधिकरणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात शहरात बेकायदेशीर बांधकाम होत आहे. त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाच्या या डोळेझाकपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाल्हेकरवाडी येथील पीसीएमसी शाळेजवळ बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी सामाजिक संघटनांच्या मदतीने प्राधिकरण प्रशासनाला निवेदन दिले. त्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे कोरडे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. शासनाच्या जागांवर बेकायदेशीर होत असलेल्या बांधकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. काही बांधकामांमुळे रस्ते झाकले गेले असल्याची माहिती वाल्हेकरवाडी येथील नागरिक संदीप कुटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.