Chinchwad: ‘मैत्री मधुमेहाशी- समज, गैरसमज, आयुर्वेदिक संशोधन’यावर शनिवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्सपार्क येथे येत्या शनिवारी (दि.2) ‘मैत्री मधुमेहाशी- समज, गैरसमज आणि त्यांचे आयुर्वेदिक संशोधन’ या विषयावर डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच नृत्यागना अमर्त्या चटर्जी यांचे कथक नृत्य देखील होणार आहे.

चिंचवड येथील सायन्सपार्क सभागृहात शनिवारी दुपारी राष्ट्रपती पारितोषकाने गौरविण्यात आलेले डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे ‘मैत्री मधुमेहाशी- समज, गैरसमज आणि त्यांचे आयुर्वेदिक संशोधन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी तीन ते सहा या वेळेत मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर व्याख्यानानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रोत्साहित संगीत संध्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत नृत्यागना अमर्त्या चटर्जी यांचे कथक नृत्य होणार आहे.

आरोग्य तपासणीबाबत अधिक माहितीसाठी सोपान शिंदे 9423787711, सुरेश राजपुरे 9561202767, तुकाराम वाळके 9423079050 यांच्याशी संपर्क साधावा तसेच मोफत आरोग्य शिबिर आणि व्याख्यानाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.