Chinchwad: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जेवणाचा दर्जा सुधारा; अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर

Improve meal quality of coronary artery patients; Otherwise MNS style answer : चिंचवडच्या ईएसआय रुग्णालयाच्या डॉक्टर व अधिकाऱ्यांना शहर मनसेची समज

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जेवणात एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा माश्या व आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो. याची दखल घेत मनसेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात धाव घेऊन, येथील डॉक्टर व अधिकारी यांना फैलावर घेत, त्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्यांना जेवणाचा दर्जा सुधारण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष,  महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह  राजू सावळे, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे उपस्थित होते.

मनसेच्या शिष्टमंडळाने पत्रकात म्हटले आहे की, कोविड रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महापालिका कोविड रुग्णांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही.

पालिकेने काही रुग्णालये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी निवडलेली आहेत. त्यातीलच एक मोहननगर ईएसआयसी हॉस्पिटल आहे.  या रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे.

_MPC_DIR_MPU_II

या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जेवणात माश्या व आळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तात्काळ सुधारण्यात यावा; अन्यथा जेवणाचा त्याग करण्यात येईल, असा इशारा कोरोनाग्रस्त रुग्णांनी या रुग्णालयास दिलेला असताना देखील रुग्णालय प्रशासन ताळ्यावर येत नाही.

हे अन्नपदार्थ खाल्याने येथील रुग्णांना पोटदुखी, ॲसिडिटी, जुलाब यासारखे त्रास होत आहेत. वारंवार सांगुनसुद्धा निकृष्ट जेवण पुरवण्यात येत असेल तर, संबंधित अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर त्वरीत कारवाई करण्यास प्रशासनाचे हात धजावतात नाहीत का?.

प्रशासनाने वेळीच यावर रोख लावावा व कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवण्याची व्यवस्था करावी. यापुढे देखील शहर मनसेचे शिष्टमंडळ शहरातील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेटी देणार आहे. कुसूर झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1