Chinchwad : श्री अग्रसेन भवनचे कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उदघाटन

समाजातील हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे -गोयल

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकारणच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुणे- मुंबई रोड, चिंचवड येथील श्री अग्रसेन भवनाचे लोकार्पण अग्रवाल समाज फेडरेशन पुणे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवीचंद बंसल, सचिव कृष्णलाल बंसल, भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल, जोगिंदर मित्तल, विनोद बंसल, सुनिल अग्रवाल, रामशरण गुप्ता, रामधारी अग्रवाल, पन्नालाल अग्रवाल, कैलाश गुप्ता, मामनचंद अग्रवाल सहित अग्रवाल समाजाचे अनेक पदाधिकारी व्यापारी, उद्योगपती उपस्थित होते.

यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले की, समाजातील हुंड्याची प्रथा पुर्णपणे बंद झाली पाहिजे. तसेच युवा वर्गाने सामाजिक कार्यात पुढे यावे. या श्री अग्रसेन भवन प्रमाणेच सुमारे पाच ऐकरात मोठे भवन निर्माण करण्याची इच्छा यावेळी गोयल यांनी व्यक्त केली. या भवनात सुसज्ज शाळा हाॅस्पिटल, लग्न समारंभासाठी मोठा हॉल असेल.

तसेच सर्व अग्रवाल बांधवांनी समाजाच्या उन्नतीसोबत देश राज्य आणि शहराच्या विकासात हातभार लावून योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी वास्तुशांती, श्रीगणेश, श्री महालक्ष्मी, श्री अग्रसेन महाराज व माता माधवीदेवी मूर्तिची स्थापना करण्यात आले. तसेच सर्व दानशूर व्यक्तींचाही सन्मान यावेळी करण्यात आले.

पहिल्या मजल्यावर कॉसमॉस बँक आहे. दुस-या मजल्यावर 5 हजार स्क्वेअर फुटाचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य ए. सी. हॉल बनविण्यात आला आहे. तिसर्‍या मजल्यावर अत्याधुनिक एक हजार फुटात किचन आणि भोजन व्यवस्थेसाठी 4 हजार स्क्वेअर फुटाची जागा उपलब्ध आहे. चौथ्या मजल्यावर श्री अग्रसेन ट्रस्टचे सुसज्ज कार्यालय आणि कॉन्फ्रेंस हॉल व पैंट्री आहे. तसेच चौथ्या मजल्यावर वर-वधु आणि पाहुण्यासाठी चार सुसज्ज ए.सी. खोल्या आहेत. तसेच एक मोठा मल्टीपर्पज हॉलचे निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे भवनात 8 व्यक्ती क्षमताच्या दोन लिफ्ट जनरेटर बैकअप सोबत उपलब्ध आहे.

आपली सामाजिक जवाबदारी पार पाडत ट्रस्टच्या वतीने गरजू लोकांच्या उपचारासाठी श्री अग्रसेन हॉस्पिटलचे देखील निर्माण केले आहे. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत सुभाष बंसल यांनी केले तर, सूत्रसंचालन कृष्णलाल बंसल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.