Chinchwad: मतदान जनजागृतीपर चित्ररथाचे उद्‌घाटन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या मतदार जनजागृती अभियानांतर्गंत 205, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य कार्यालयात मतदान जनजागृतीपर पथनाट्याचे व चित्ररथाचे उद्‌घाटन चिंचवड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरात मतदार जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या या चित्ररथाव्दारे व पथनाट्यांव्दारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून विविध ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्मिता झगडे, नोडल अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.