Chinchwad : ‘बीव्हीजी’च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

एमपीसी न्यूज – भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून आज (बुधवारी) सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. बीव्हीजीच्या पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयावर देखील छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.

आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिंचवड येथील ‘बीव्हीजी’च्या कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या सुमारे 40 अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकाने छापा टाकला. कार्यालयातील कोणत्याही कर्मचा-याला बाहेर न सोडता सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले असून कार्यालयाचा इतर संपर्क देखील बंद करण्यात आला आहे.

हाऊस किपींग आणि आरोग्य क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून बीव्हीजीचा लौकिक आहे. राष्ट्रपती भवनासह देशभरातील अनेक शासकीय कार्यालयात तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्या व संस्थांमध्ये बीव्हीजी स्वच्छता सेवा पुरवत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.