Chinchwad : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील शिथिलता जाहीर झाल्यापासून पोलिसांच्या कारवाईत वाढ

Chinchwad: Increased police action after the relaxation in lockdown 4.0

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे रोजी सुरू झाला आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील शिथिलता आणि नियमावली 22 मे पासून लागू करण्यात आली आहे. नागरिकांसाठी लॉकडाऊनची शिथिलता वाढल्याने पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. 22 मे पर्यंत 100च्या आसपास असणारा कारवाईचा आकडा 22 मे रोजी 250 तर 23 मे रोजी 336 वर पोहोचला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शनिवारी (दि. 23) एकाच दिवशी शहरातील तब्बल 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात वायसीएम रुग्णालयातील एक डॉक्टर, तसेच एक नर्सचाही समावेश आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आलेल्या पिंपरी, वाकड, वडमुखवाडीतील काही परिसर महापालिका प्रशासनाने सील केला आहे. शिथिलता वाढल्याने नागरिक रस्त्यावर येत आहेत. परिस्थिती पूर्ववत होत असल्याने कोरोना विषाणू पसरण्याचा धोकाही वाढू लागला आहे.

पोलिसांकडून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोनाचे संकट वाढत असतानाही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने कारावाई केली जात आहे.

शनिवारी (दि. 23) पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे भोसरी एमआयडीसी (40), भोसरी (18), पिंपरी (24), चिंचवड (40), निगडी (8), आळंदी (5), चाकण (1), दिघी (9), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (19), वाकड (78), हिंजवडी (19), देहूरोड (23), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (14), चिखली (19), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (2) अशी एकूण 336 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.