Chinchwad : चिंचवडमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शन ;1 ते 3 डिसेंबर रोजी ऑटो क्लस्टर येथे होणार तीन दिवसीय प्रदर्शन

एमपीसी न्यूज – वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र (Chinchwad)असलेल्या पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन भारतातील सर्वात मोठे असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड येथे हे प्रदर्शन होईल.

याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मुकेश यादव, सतीश मंडोळे, हेमंत पाध्ये, विलास रबडे आदी उपस्थित होते.

सातत्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील (Chinchwad)नवकल्पना, पर्यावरणपूरक वाहतूक उपाय आणि दूरदर्शी उपक्रम यांचे प्रदर्शन यावेळी होणार आहे. आयआयईव्हीच्या माध्यमातून उत्पादक, प्रयोगशील आणि नेतृत्वशील उद्योजकांना शाश्वत गतिशीलतेच्या विशाल क्षमतेचा शोध घेण्यासाठी भव्य व्यासपीठ निर्माण होणार आहे. ‘आयआयईव्ही 2023 मध्ये 200 हून अधिक प्रदर्शक संपूर्ण भारत आणि जगभरातील 20000 हून अधिक अभ्यागत उपस्थित राहणार आहेत. वाहन क्षेत्रातील हा सर्वात महत्त्वाचा मेळावा असून यामुळे उपस्थितांना ईव्ही उद्योगाबद्दल खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टिकोन मिळेल.

Bhosari : भोसरी येथे गुरु नमन महोत्सव मंगलमय वातावरणात संपन्न

प्रदर्शनात 7000 हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक सहभागी होणार असून 3000 पेक्षा अधिक उत्पादने आणि सेवांची यावेळी प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच 30 हून अधिक नवीन उत्पादनांचे यावेळी प्रक्षेपण होणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे ‘आयआयईव्ही’ नावीन्यतेचे केंद्रस्थान बनणार आहे. साल 2030 पर्यंत जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे भारताचे उद्दिष्ट असून यातूनच शाश्वत भविष्यासाठी भारताची भूमिका समोर बेते

“भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे 2.8 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून ही बाजारपेठ अधिक वाढीसाठी सज्ज झाली आहे. वर्ष 2030 पर्यंत 94.4 टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे निदर्शनात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होते.” अशी माहिती फ्युचर्स ग्रुप (इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनी) चे संचालक नमित गुप्ता यांनी दिली

गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, 2021-22 मध्ये 8 हजार 668 वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे.

‘आयआयईव्ही मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम, चर्चासत्रे, नेटवर्किंग यांचा अनुभव घेता येणार आहे. तसेच उत्पादक, पर्यावरण प्रेमी, तंत्रज्ञानप्रेमी, धोरण रचनाकार आणि वाहनप्रेमींना आकर्षित करणारा हा कार्यक्रम आहे. आयआयईव्ही शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर ईव्हीच्या सकारात्मक परिणामाबद्दल जागरुकता वाढविण्याचा याचा उद्देश आहे.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT), इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (IESA), स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स (SCGJ) आणि प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-मुंबई) यांच्या सहकार्याने ग्लोब टेक मीडिया यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

तसेच सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल (SMEV), फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी फायनान्सर्स असोसिएशन ऑफ इंडिया (EMFAI) यांसारख्या प्रमुख संस्थांकडून या कार्यक्रमाला पाठिंबा मिळतो. केई आय केबल्स, लुकास टीव्हीएस, मुसाशी ऑटो, सेमको इन्फ्राटेक, केके लाइटिंग, रेडन बॅटरीज, निकोह ईव्ही, डीआरएस ऑटो, आयपीसी इंटरनॅशनल आदींचा यात समावेश आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.