Chinchwad : भारतीय संविधान हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत उदाहरण – डॉ. राजेंद्र कांकरिया

एमपीसी न्यूज – शोधकता, सम्यकता, निर्भयता, नम्रता, कृतिशीलता आणि नैतिकता हे वैज्ञानिक दृष्टीकोनचे काही निकष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या निकषचा पुरेपूर वापर करून संविधानला वैज्ञानिक दृष्टीकोनचे अधिेूस्थान दिल्याचे संविधानचे अवलोकन करताना जाणवते. त्यामुळे भारतीय संविधान हे वैज्ञानिक दृष्टिकोनचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे मत नुकतेच शिवाजी विद्यापीठाचे भूतपूर्व कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी व्यक्त केले.

प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित भारतीय संविधान आणि त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम या होत्या. पिंपरी-चिंचवड अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांची निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच नव्याने या शाखेत समावेश करण्यात आलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पदाधिकारी सुभाष सोळंकी, अ‍ॅड. मनीषा महाजन, विजय सुर्वे, नितीन खलाने, रोहिणी जाधव, विवेक सांबरे, संजय बनसोडे, संदीप शिंदे, अर्चना पिंपळकर आदी उपस्थित होते.

  • आपल्या भाषणात डॉ. राजेंद्र कांकरीया पुढे म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास त्याच देशात होतो ज्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अबाधित असतं. भारतीय संविधानने या स्वातंत्र्यची हमी दिलेली आहे. भारताचा सर्वांगीण विकास आणि मानवी मूल्यांची जपवणूक याकरिता हे स्वातंत्र्य आवश्यक आहे, घटनेतील 395 कलमे, 22 भाग,12 परिच्छेद याचीच ग्वाही देतात. घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या 102 दुरुस्त्या घटनेची लवचिकता व कणखरतेचे दयोतक आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनने विचार केला आणि आपला विवेक शाबूत ठेवला तर हे संविधान नेस्तनाबूत करण्याचा कोणताही प्रयत्न कोणी करू शकणार नाही आणि केला तर तो कदापिही यशस्वी होणार नाही हे या संविधानचे अमूल्य लक्षण आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. पोर्णिमा कदम यावेळी म्हणाल्या, ज्ञानदानाचे पवित्र कार्य आणखी आकर्षक बनविण्यासाठी देण्यात आलेल्या एलसीडी प्रोजेक्टरचा वापर अंनिस माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाचे तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

  • यावेळी ग्रंथदिंडीच्या प्रयत्नाने येथील शाखेला मिळालेल्या एलसीडीचे हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य पौर्णिमा कदम यांच्या हस्ते झाले, त्यासाठी प्रयत्न करणारे विश्वास पेंडसे, पूर्णनंद सामंत, आपटे व शैलेश चौधरी, कार्याध्यक्ष संजय बारी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला पहिल्यांदा आलेल्या सदस्य चा परीचय करण्यात आला. समितीची कार्यपद्धती व चतुसूत्री राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी सांगितले, शाखेबद्दल व उपक्रम बद्दल यांनी माहिती दिली, सूत्रसंचालन सचिव एकनाथ पाठक यांनी तर आभार सहसचिव अंजली इंगळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.