Chinchwad : पहिला सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन; दरमहा ६०० पेक्षा जास्त युनिटची होणार बचत

एमपीसी न्यूज – केशवनगर चिंचवडमध्ये काकडे टाऊनशीप आय आणि जे सोसायटीमध्ये पहिला सौरऊर्जा प्रकलपाचे उदघाटन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर तसेच महावितरण अभियंता शीतल मेश्राम, भाजप पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, कैलास राणे, युवा अध्यक्ष गणेश बच्चे, अभिजित पवार, सौरभ करणावट, सिद्धू लोणी आदी उपस्थित होते.

  • या प्रकल्पाचे कॉरबेट सोलरचे मुख्य भूषण पाटील यांनी माहिती दिली. हा प्रकल्प ५ kw चा असून यास ४०० स्केअर फिट जागा लागते. दरमहा ६०० पेक्षा जास्त युनिटची बचत होणार आहे सुमारे ३ लाख रुपये खर्च आला असून यास ७०,५०० रु.शासकीय अनुदान मिळाले आहे. तसेच २५ वर्षे वारंटी देण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फायदा पण होणार आहे. महावितरणकडून याकामी योग्य सहकार्य मिळाले. अशा लोकोपयोगी प्रकल्पास नेहमीच शक्य तेवढे सहकार्य मिळेल आणि हा प्रकल्प जनजागृती करून महत्व सांगून जास्तीत जास्त सोसायटीमध्ये राबविण्यास पुढाकार राहील, असे आश्वासन महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी दिले. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संजय कारदरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.