Chinchwad : जास्त बूथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज : – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना( Chinchwad) करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बूथ संख्या असलेल्या तीन मतदान केंद्रांना भेट दिली.

मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोग, पोलीस आणि अन्य सर्वच विभागांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूरोड, रावेत, वाकड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्याचा काही भाग हे पोलीस स्टेशन येतात.

Lonavala : लायन्स पॉईंटवरुन पडून तरुणीचा मृत्यू

शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी पोलीस ठाण्याचा काही भाग, एमआयडीसी भोसरी, चिखली, दिघी, आळंदी, चाकण, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा भाग येतो. तर हिंजवडी पोलीस ठाण्याचा काही भाग मावळ तर काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मोठ्या स्तरावर पिंपरी-चिंचवड पोलिसांना निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

गुरुवारी (दि. 22) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक बूथसंख्या असलेल्या मतदान केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये महादू सस्ते मनपा शाळा बोराडेवाडी, सावित्रीबाई फुले मनपा शाळा मोशी गावठाण, नागेश्वर विद्यालय मोशी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. यावेळी तंच्यासोबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार उपस्थित ( Chinchwad) होते.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share