Chinchwad : चिंचवडगावात 15 दिवसांपासून अत्यल्प पाणी पुरवठा, नागरिक हैराण

Chinchwad: Insufficient water supply in Chinchwad for 15 days, harassing citizens

एमपीसी न्यूज – चिंचवडगावात 15 दिवसांपासून अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.

चिंचवडगावातील नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. चिंचवड गावठाण, तानाजी नगर, गोखले पार्क तसेच सुखकर्ता काॅलनी मधील नागरिकांना पाणी कमतरतेचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकार्याकडे याबाबत विचारणा केली असता, मीटरमध्ये कचरा अडकला असेल किंवा नळ साफ करा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अधिकारी सुद्धा या समस्येची नोंद घेत नसल्याने चिंचवड गावचे नागरिक हैराण झाले आहेत.

चिंचवड गावचे रहिवासी गजानन पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला मागच्या पंधरा दिवसांपासून कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. कमी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण असून पाणी पुरवठा अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता ते सुद्धा  उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे जाब कुणाला विचारावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.