Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश नुकतेच पोलीस आयुक्तांनी दिले.

पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेत एकूण 10 वाहतूक विभाग आहेत. पूर्वी त्यासाठी एक सहाय्यक पोलीस आयुक्त होते. मात्र आता या 10 वाहतूक विभागांची विभागणी करून दोन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण यांना वाहतूक विभाग – 1 ची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. तर सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले यांच्याकडे वाहतूक विभाग – 2 ची जबाबदारी असणार आहे.

वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांना गुन्हे – 2 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर विशेष शाखेचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची चाकण विभागात बदली करण्यात आली आहे. चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचे पद रिक्त होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या जागी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.