Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पाच पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Internal transfers of five police inspectors in Pimpri-Chinchwad city

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाच पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश आज (गुरुवारी) पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार सध्या रजेवर आहेत. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांची चाकण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची नुकतीच नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. ती जागा सध्या रिकामी असल्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची सांगवी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) यांची विशेष शाखा (एस बी) येथे बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून कुठे) –

प्रकाश धस (विशेष शाखा ते चाकण)
रंगनाथ उंडे (तळेगाव एमआयडीसी ते सांगवी)
प्रदीप लोंढे (पिंपरी वाहतूक ते तळेगाव एमआयडीसी)
प्रसाद गोकुळे (वाहतूक शाखा ते विशेष शाखा)
कल्याण पवार (चाकण ते नियंत्रण कक्ष)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.