BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : बंद घरातून दागिने, रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली.

विनय चंद्रकांत देशपांडे (वय 43 , रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 25 अॉगस्ट 2019 या कालावधीत फिर्यादी देशपांडे यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोरटय़ाने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश केला.

घरातील एक तोळा वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, इतर वस्तू व पाच हजार रुपये रोख असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3