Chinchwad : भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरवमध्ये बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आज (सोमवारी) मतदानाचा हक्का बजावला. पिंपळेगुरव येथील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात त्यांनी आपल्या मुलीसह मतदानाचा हक्क बजाविला.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरव येथील महापालिकेच्या शाळेत सोमवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

आमदार जगताप यांनी मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक सागर आंगोळकर, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजक माऊली जगताप यांच्यासह मतदान केले. मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढवून राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी मतदानानंतर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.