Chinchwad : लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पोलिसांच्या कारवाईतही शिथिलता; मंगळवारी 64 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बहुतांश क्षेत्रात काही प्रमाणात सूट मिळाली आहे. नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यामुळे पोलिसांच्या कारवाईत देखील काही प्रमाणात शिथिलता दिसून येत आहे.

लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू असताना दररोज 200 च्या आसपास असणारा कारवाईचा आकडा आता 100च्या आतच आहे. मंगळवारी (दि. 19) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 64 जणांवर कारवाई केली आहे.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवार पासून सुरू झाला आहे. यात नागरिकांना लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळाली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यासाठी नियमावली जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्याची नियमावली 22 मे पासून लागू होणार आहे.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून खंड पडलेला नाही.

मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (3), भोसरी (2), पिंपरी (2), चिंचवड (1), निगडी (12), आळंदी (3), चाकण (0), दिघी (8), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (12), वाकड (3), हिंजवडी (6), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (8), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) एकूण 64 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.