Chinchwad : रामोशी, बेरड समाजाचा लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जय मल्हार क्रांती संघटनेने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले. जय मल्हार क्रांती संघटना शहरातील रामोशी, बेरड आणि बेडर समाजाचे प्रतिनिधित्व करते. हा सर्व समाज आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी असल्याचे सुभाष जाधव म्हणाले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष दौलत शितोळे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय धनवटे तसेच संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सुभाष जाधव यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील देवांग कोष्टी समाजाने देखील जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.