Chinchwad : छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांचा आज लेह लडाख स्लाइड शो

एमपीसी न्यूज- वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या स्लाइड शो चे आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आज, सोमवारी संध्याकाळी 5 वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.

या स्लाइड शो मध्ये लेह लडाख भागातील निसर्गसौन्दर्य, तेथील खडतर राहणीमान टिपणाऱ्या 254 स्लाईड्स आणि त्या संदर्भातील माहिती दिली जाणार आहे. पर्यटनप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कशाळीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.