BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : लायन्स क्लबतर्फे सोमवारी चिंचवड येथे व्यक्तिमत्व स्पर्धा

एमपीसी न्यूज- लायन्स तेजश्री अडिगे संचालित लायन्स क्लबतर्फे लायन्स क्लब युथ आयकॉन च्यावतीने युथ करिता व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सोमवार दि. 29 एप्रिलला होणार असल्याची माहिती तेजश्री अडिगे यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 ते 28 वर्षे व युवा करिता 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे. सिलाई ब्रॅण्डचा मॉडेल करण नाथानी हा मुलांकरिता फॅशन शोसाठी कॉरिओग्राफी करणार आहे. या कार्यक्रमासाठी मॉडेल आशा नेगी, फॅशन फोटोग्राफर अश्विन कौलगुड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमासाठी एमजेएफ लायन्सचे रमेश शा, एमजेएफ लायन्स ओमप्रकाश पेठे, एमजेएफ लायन्स रमेश शास्त्री, व्हाईस डिस्ट्रिक्ट गर्व्हनर इलेक्ट एमजेएफ लायन्स हेमंच नाईक आदी उपस्थित राहणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3