Chinchwad : एम्पायर इस्टेट पुलाखाली सापडली 43 जिवंत काडतुसे

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे रेल्वे लाईनच्या जवळ गुरुवारी रात्री एका कचरा वेचक महिलेला 43 जिवंत काडतुसे सापडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सापडलेली काडतुसे तीन प्रकारची आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कचरा वेचक महिला चिंचवड येथे एम्पायर इस्टेट पुलाखाली रेल्वे लाईनच्या बाजूला कचरा वेचत होती. तिला एका लाल रंगाच्या पिशवीत जिवंत काडतुसे सापडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे पाहिल्याने कचरा वेचक महिला घाबरली. तिने तात्काळ पिंपरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सर्व काडतुसे हस्तगत केली. त्यामध्ये तीन प्रकारची काडतुसे आहेत. शहरात सध्या बेकायदेशीर पिस्तुल पकडण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कडतुसांची विल्हेवाट लावण्यासाठी ही काडतुसे टाकली असल्याचा संशय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.