Chinchwad Lockdown News : लॉकडाऊन कालावधीत पोलिसांसाठी चहा, पाणी, नाष्ट्याची सोय

एमपीसी न्यूज – चिंचवड परिसरातील श्री स्वामी समर्थ इंडस्ट्रीज, राजवी इंटरप्राईजेस, एस.  के.  इंडस्ट्रीजच्या स्वाती  शेवाळे, स्मिता फाउंडेशन या संस्था तसेच प्रदीप नाईक यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत बंदोबस्तावरील पोलीस बांधवांना चहा-नाष्टा देण्यात आला. समाज सुरक्षित रहावा यासाठी पोलीस बांधव आपल्या घरापासून दूर राहून चोख कर्तव्य बजावत आहेत. अशा प्रसंगी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे ही संवेदनशील समाजाची जबाबदारी आहे.

कोरोना साथीमुळे सर्व जग हैराण झाले आहे. त्यातून कुणीच सुटले नाही. सध्या महाराष्ट्र देखील कोरोनाशी असेच दोन हात करत आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. आपले कोरोना योद्धा पोलीस बांधव अशा परिस्थितीमध्ये अत्यंत धीराने, संयमाने परिस्थिती हाताळत आहेत. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून, मनाचा तोल ढळू न देता तहान, भूक, झोप याची पर्वा न करता चोवीस तास आपले कर्तव्य निभावत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस बांधव देखील याला अपवाद नाहीत. अशा सामाजिक संकटाच्या घडीला आपल्या पोलीस बांधवांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांना जेवण चहा, नाष्टा इत्यादी बाबत व्यवस्था पाहणे हे देखील आपले कर्तव्य आहे.

याच भावनेतून श्री स्वामी समर्थ इंडस्ट्रीज, राजवी इंटरप्राईजेस, एस के इंडस्ट्रीजच्या स्वाती शेवाळे, स्मिता फाउंडेशन या संस्था तसेच प्रदीप नाईक यांनी रात्रीच्या वेळी स्वतः आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसोबत फिरून रात्रीच्या वेळी पोलिसांच्या तपासणी नाक्यावर पोलीस बांधवाना चहा, पाणी, नाष्टा इत्यादीची व्यवस्था पाहत आहेत.

मागील वर्षी देखील लॉकडाऊनमध्ये प्रदीप नाईक यांनी सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला होता. ‘आपण खूप मोठे काम करीत आहोत अशातला भाग नसून, ते आपले सामाजिक कर्तव्य आहे. आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, उपेक्षित, गरजू निराधार, अपंग मनोरुग्ण इत्यादी समाजातील घटकांना मदत करण्यास कटीबद्ध असल्याचे प्रदीप नाईक यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.