Chinchwad : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 3 हजार 700 जणांविरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 199 जणांवर मंगळवारी (दि. 14) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आत्तापर्यंत तीन हजार 700 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन सोबतच संचारबंदीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मंगळवारी केलेली कारवाई – 

पिंपरी – 01

चिंचवड – 24

भोसरी – 13

एमआयडीसी भोसरी – 17

निगडी – 16

दिघी – 22

आळंदी – 06

चाकण – 06

वाकड – 30

हिंजवडी – 09

सांगवी – 09

चिखली – 27

तळेगाव दाभाडे – 04

तळेगाव एमआयडीसी – 03

रावेत चौकी – 04

म्हाळंगे चौकी – 03

शिरगाव चौकी – 05

एकुण – 199

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.