Chinchwad: मंगलमूर्तींच्या पालखीचे शनिवारी मोरगावकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थानातून माघी यात्रेनिमित्त श्रीमान महासाधू श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे येत्या शनिवारी (दि. 25) मोरगांवकडे प्रस्थान होणार आहे. याबाबतची माहिती देवस्थानाकडून नुकतीच देण्यात आली आहे.

श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातून पालखी सोहळ्याला शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. ढोल-ताशा पथके, भजनी मंडळे, बँड पथके मिरवणूक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

पिंपरीमार्गे ही पालखी पुण्याकडे जाणार आहे. कसबा पेठेतील एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा शनिवारी मुक्काम असेल. रविवारी सासवड येथील क-हाबाई मंदिरात पालखी मुक्कामी असणार आहे.

सोमवारी पालखी मोरगाव येथे पोहचणार आहे. त्याठिकाणी दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. गुरुवारी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होईल. चार फेब्रुवारी 2020 रोजी पालखी दुपारी दोन वाजता चिंचवडमध्ये दाखल होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.