Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीत वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज – पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी)राज्यस्तरीय 11 व्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सात हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संघाचे सचिव विजय भोजने, कार्याध्यक्ष दीपक भोजने यांनी दिली.

रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये रविवारी सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख असणार आहेत. महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, जगदीश मुळीक, माजी आमदार प्रकाश शेंडगे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सांगलीच्या महापौर संगीता खोत, भाजप प्रवक्ते गणेश हाके, तळेगावाचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, राम मांडूरके उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याचे संयोजनात अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, सचिव विजय भोजने, खजिनदार अभिमन्यू गाडेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, संचालक गणेश लंबाते, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, दर्शन गुंड, पांडुरंग उराडे यांनी पुढाकार घेतला आहे.

या वधू-वर मेळाव्यास समाजातील सर्व शाखेतील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.