Chinchwad : मार्केटिंग क्षेत्र करिअर संधीसाठी उत्तम क्षेत्र – श्रीरंग दामले

एमपीसी न्यूज – एमबीए विद्या शाखेच्या (Chinchwad) विद्यार्थ्यांना विपणन अर्थात मार्केटिंग हे क्षेत्र सुद्धा करियर संधीसाठी उत्तम क्षेत्र आहे, असे मत कल्याणी मॅक्सिऑन व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्री व विपणन विभागाचे प्रमुख श्रीरंग दामले यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विपणन क्षेत्रातील करियर संधी या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.

 यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मार्केटिंग क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य अद्ययावत ज्ञान प्रामाणिकपणा सोशिकता व कष्ट करण्याची तयारी आधी गुण व्यक्तिमत्त्वात असणे गरजेचे आहे. दैनंदिन वर्तमानपत्राचे सजगतेने वाचन, मोबाईल व समाज माध्यमांचा आवश्यक तेवढा योग्य वापर या गोष्टींचे तंतोतंत पालन केल्यास स्वतःचे व्यक्तिमत्व उद्योगास अनुकूल करता येऊ शकते ,असेही दामले यांनी सांगितले.

Nigdi : रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

मार्केटिंग हे क्षेत्र नित्य नवनवीन आव्हानांचे असून या क्षेत्रात भरघोस पगार, प्रोत्साहनपर भत्ते ,प्रवासाच्या संधी, नवनवीन ओळखीच्या संधी असे अन्य लाभ देखील उपलब्ध होतात त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.या व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक शिवाजी मुंढे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुष्पराज वाघ यांनी (Chinchwad) केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.