Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीसमोर पार्क केलेल्या (Chinchwad) ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 2 जून रोजी सकाळी सात वाजता एक्साईड बॅटरी कंपनी समोर शंकर नगर चिंचवड येथे उघडकीस आली.

सुनील अशोक थोरात (वय 23, रा. परभणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांनी त्यांचा ट्रक (एमएच 12/टीव्ही 9914) एक्साईड बॅटरी कंपनी समोर 1 जून रोजी रात्री दहा वाजता पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या (Chinchwad) ट्रकमधील 98 हजार 600 रुपये किमतीच्या 18 ॲल्युमिनियमच्या लीड चोरी करून नेल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.