Chinchwad: आमदार लक्ष्मण जगताप व परिवाराची ‘पीएम केयर्स’ निधीला पाच लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. मी माझ्या परीने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. ज्याला शक्य आहे त्याने पुढे येऊन पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावे. लॉकडाऊन संपेपर्यंत आपण सर्वजण घरामध्येच सुरक्षित राहूया, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. त्यासाठी पीएम केअर्स फंड अर्थात पंतप्रधान सहाय्यता निधीची त्यांनी घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील अनेकांनी पुढे येऊन मदत केली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील पुढे येत पंतप्रधान सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “कोरोना विरोधातील लढाईत संपूर्ण देश एकजूट झाला आहे. डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसोबतच सर्वजण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपले योगदान देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर सिनेकलाकार, खेळाडू, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच सामान्य नागरिकांनीही या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे.

मी व माझ्या कुटुंबाने सुद्धा कर्तव्य म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केली आहे. आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. ज्याला शक्य आहे त्या प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेन. आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला तोंड देऊया. घरामध्येच सुरक्षित राहा, असे आवाहन आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवडधील जनतेला केले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.