Chinchwad: महिला वाहतूक पोलिसांचा मोबाईल हिसकावला ; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमन करणार्‍या महिला वाहतूक पोलीस शिपायासोबत झटापट करून त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने घेवून जाणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान चिंचवडमधील अहिंसा चौकात घडली.

अनिल मनोहर जाधव (वय 30, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रूपाली दीपक वाल्हेकर (वय-30) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाल्हेकर शुक्रवारी सायंकाळी चिंचवडमधील अहिंसा चौकात वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला अडविले असता त्याने त्यांच्याशी झटापट करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांच्या हातातील 10 हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.

पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली आहे. फौजदार झेंडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like