Chinchwad : मोहननगरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने पाळला कडकडीत जनता कर्फ्यू

Mohannagar residents voluntarily observed strict public curfew : मोहननगरवासियांनी स्वयंस्फूर्तीने पाळला कडकडीत जनता कर्फ्यू

एमपीसीन्यूज  : पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. चिंचवड येथील मोहननगर येथेही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक शिवसेना नगरसेविका मीनल यादव व शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांनी तीन दिवस स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज, शनिवारी पहिल्या दिवशी कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला.

मोहननगर येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नव्हता.

त्यामुळे स्थानिक शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व्यापारी, भाजी विक्रेते आणि रहिवाशांनी सलग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाची अंलबजावणी आजपासून ( शनिवार) करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी मोहननगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते.

यामध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने आणि रुग्णालयांना वगळण्यात आले होते. तर दूधविक्री पहाटे पाच ते सकाळी वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली होती.

नागरिकांनी या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नगरसेविका यादव यांनी नागरिकांचे आभार मानले.

दरम्यान, पुढचे दोन दिवस सुद्धा असाच कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्धार येथील व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मोहनगरवासियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.