Chinchwad : महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला रविवारपासून प्रारंभ

एमपीसी न्यूज- सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदेपासून म्हणजे रविवार (दि. 12) पासून महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदा तिथीक्षय असल्यामुळे ही द्वारयात्रा तीन दिवस चालणार आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वारयात्रा काढली जाते. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणाऱ्या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते.

यंदा काढण्यात येणाऱ्या द्वारयात्रा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे –

दि. 12 ऑगस्ट – (पूर्वद्वार) श्री मांजराई देवी, पिंपरी
दि. 13 ऑगस्ट – (दक्षिणद्वार) श्री आसराई देवी, वाकड
दि. 14 ऑगस्ट – सकाळी (पश्चिमद्वार) श्री ओझराई देवी, रावेत आणि दुपारी श्री मुक्ताई देवी आकुर्डी या ठिकाणी हे द्वारयात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी रोज सकाळी 9 वाजता द्वारयात्रेचे मंगलमूर्ती वाड्यातून प्रस्थान होणार असून घाटावर दर्शन, द्वारदेवतेची पूजा, गोंधळ, जोगवा, परत येताना घाटावर पदांची समाप्ती त्यानंतर मंगलमूर्ती वाड्यात सर्वांना प्रसाद असा द्वारयात्रेचा कार्यक्रम असणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.