Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण व संत भक्ती संहिता वाचन

एमपीसी न्यूज- चिंचवड येथे सुरु असलेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण आणि संत भक्ती संहिता वाचन सादर करण्याची संधी संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड शाखेला मिळाली आहे अशी माहिती संस्कार भारती पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव हर्षद कुलकर्णी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत शनिवारी (दि. 22) सकाळी 7 वाजता संगीत विधा “गीतरामायण” तर रविवारी (दि. 23) सकाळी 7 वाजता साहित्य विधा “संत भक्ती संहीता वाचन” हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घ्यावा से आवाहन हर्षद कुलकर्णी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.