Chinchwad : मोरगाव, सिद्धटेक, थेऊर यासह मोरया गोसावी मंदिर भाविकांसाठी बंद

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय व मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने अष्टविनायकांपैकी मोरगाव, सिद्धटेक व थेऊर येथील मंदिरांसह चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर 31 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे 31 मार्च  पर्यंत  चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे अंतर्गत येत असलेल्या अष्टविनायक मंदिर, मोरगाव, सिध्दटेक, थेऊर व चिंचवड येथील मंदिरामध्ये गर्दी न करण्याचे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.