Chinchwad : चार वर्षाच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – बिजलीनगर येथील चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सामाजिक कार्यकर्ते राजन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बिजलीनगर परिसरातील नागरिक,महिला वर्ग तसेच लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रवक्ते फजल शेख यांनी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खुळे यांच्याकडे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.