Chinchwad : वायसीएममधील शवविच्छेदन गृहाचा होणार विस्तार; एकाच वेळी नऊ मृतदेहाचे शवविच्छेदन शक्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात (Chinchwad) केवळ पिंपरी-चिंचवड शहर नाही तर आसपासचे चाकण, मावळ परिसरातूनही शवविच्छेदनासाठी मृतदेह येत असतात. त्यामुळे मरणानंतरही शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेहांना वेटींग करावे लागत होते. ज्याचा मनस्ताप नातेवाईक तसेच पोलिसांनाही तपास विलंब होत होता. यावर अखेर तोडगा निघाला असून वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचा विस्तार होत असून नवीन शवविच्छेदन विभागात एका वेळी नऊ मृतदेहांचे शवविच्छेदन शक्य होणार आहे. मे 2023 पासून नवीन इमारत कार्यरत होणार आहे.

 

केवळ शवविच्छेदनच नाही तर या बरोबरच कोल्ड स्टोरेज आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी गॅलरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, संग्रहालय अशा विविध सुविधा देखील नव्या इमारतीत असणार आहेत. शवविच्छेदन गृहात न्यायवैद्यक शास्त्राचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि इतर स्टाफ देण्याची प्रकिया सुरु आहे. त्यांच्यासाठी नव्या इमारतीमध्ये स्वतंत्र दालने असणार आहेत. न्यायवैद्यक शास्त्रातील तज्ज्ञ देखील नेमले जाणार आहेत. कोल्ड स्टोरेज ची क्षमता 20 पेट्यांतून वाढवून ती 60 पेट्या एवढी केली जाणार आहे.

 

नव्या इमारतीत सहा डॉक्टर आणि 16 कर्मचारी असावेत. तसेच सध्या एक फॉरेन्सिक एक्सपर्ट असून चार फॉरेन्सिक एक्सपर्ट असावेत, अशी मागणी केली आहे. फोटोग्राफी, शस्त्र, विषबाधा या संबंधित सखोल माहिती असणारे संग्रहालय असेल. हे संग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुले राहील. 60 विद्यार्थी क्षमतेचा सेमिनार हॉल असेल. तिथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेमिनार होऊ शकतील.

Chikhali : चिखली येथे गुटख्यासह 17 लाखांचा ऐवज जप्त

 

सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले (Chinchwad) मिनी ऑपरेशन थिएटर असेल. या ऍडव्हान्स लर्निंग सेंटर मध्ये विद्यार्थी इन कॅमेरा आपल्या विषयाशी संबंधित शस्त्रक्रिया करू शकतील.नव्या इमारतीत कामकाज सुरु झाल्यानंतर जुन्या इमारतीमध्ये डी कंपोज बॉडी रूम बनविली जाणार आहे.रुग्णवाहिका आणि नातेवाईकांच्या वाहनांसाठी नव्या इमारतीत पार्किंगची सोय असेल.

उत्पन्न मिळणार – 

कोल्ड स्टोरेज – 120 रुपये प्रति दिवस, मेडिकल कॉलेज – 1 लाख 25 हजार डिपॉझिट आणि 20 ते 40 हजार रुपये वार्षिक फी, हॉल, लर्निंग सेंटर भाडे तत्वावर दिले जाणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.