Chinchwad: महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला सुरुवात

Chinchwad: Morya Gosavi's Dwar Yatra begins दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या दिवशी श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्वस्त देव महाराज यांच्याबरोबर वाजत गाजत भाविकांचा समुदाय निघतो.

एमपीसी न्यूज – श्रावण महिना सुरू झाल्याने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंगलमूर्ती द्वार यात्रेला मंगळवारी (दि.22) प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा साधेपणाने काढण्यात आली होती.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चतुर्थी पर्यंत असे चार दिवस मोरया गोसावींची द्वारयात्रा काढली जाते. दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या दिवशी श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्वस्त देव महाराज यांच्याबरोबर वाजत गाजत भाविकांचा समुदाय निघतो.

प्रारंभी मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेवून हा समुदाय निघतो. या ठिकाणी पोहोचल्यावर द्वार देवतेचे पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी केले जातात. परत येताना मोरया गोसावी समाधी मंदिरात यात्रेचा समारोप होतो.

श्रावण महिन्यात चार दिवस पिंपरी, वाकड, रावेतचा रामाडीचा डोंगर आणि आकुर्डी या ठिकाणी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्ताई या चार द्वार देवतांची यात्रा करून पूजा केली जाते.

पुन्हा आल्यावर उरलेली धूपारतीची पदे घाटावर केली जाते. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. शुक्रवारी (दि.24) या द्वार यात्रेचा समारोप होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.