Chinchwad : खासदार अमोल कोल्हे यांची दिलीप सोनिगरा ज्वेलर्सला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या (Chinchwad) चिंचवड येथील मुख्य शाखेत भेट दिली. सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा, करण सोनिगरा, सोनिगरा परिवारातील सदस्य आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने डॉ. कोल्हे यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. कोल्हे यांचे चाहते आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या ग्राहकांनी गर्दी केली.

कुमार नेवाळे, संगीता तरडे, दिनकर चिंचवडे, नितीन चिंचवडे, शिवाजी सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोनिगरा ज्वेलर्स शोरूम मधील विविध सोन्याचे आणि चांदीचे दागिने पाहिले. त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठीमधील शिवाजी महाराज आदींचे त्यांनी कौतुक केले. शोरुमच्या दोन्ही मजल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली.

Talegaon : मला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचं नाव समोर आलंच पाहिजे – सुनील शेळके

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची मोहिनी ब्रँड असलेल्या शेजारच्या शाखेमध्ये देखील डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. दोन्ही शोरुम मधील पारंपारिक दागिन्यांचेही त्यांनी कौतुक केले.

दिलीप सोनिगरा म्हणाले, “खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अंगठी पहिली. त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.”

‘एमपीसी न्यूज’चे बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना एमपीसी न्यूजचे मासिक देऊन त्यांचे स्वागत केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.