Chinchwad : ‘एमपीसी न्यूज’ इम्पॅक्ट; उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षक पदावर बढती मिळालेले 17 अधिकारी ‘रिलीव्ह’

एमपीसी न्यूज – पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळलेल्या पोलीस अधिका-यांना आज (गुरुवारी) ‘रिलीव्ह’ करण्यात आले आहे. ‘एमपीसी न्यूज’ने बढती मिळालेले अधिकारी केंव्हा रिलीव्ह होणार? याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर काही तासातच त्यावर अंमलबजावणी झाली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत.

राज्यातील सुमारे 1 हजार 558 पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती करण्यात आली. याबाबतचे आदेश महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातून 30 ऑगस्ट 2019 रोजी काढण्यात आले. राज्यातील इतर आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांमध्ये बढती झालेले अधिकारी हजर झाले आणि त्यांना पोस्टिंग देखील मिळाल्या. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांना अजूनही सोडण्यात आलेले नव्हते. बढतीच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे त्या पोलीस अधिका-यांना ज्यादा अधिकाराबरोबर वेतनवाढ, अन्य भत्ते आणि सुविधांपासून वंचित राहावे लागले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची सर्वात मोठी अडचण आहे. त्यात ऐन मोक्याच्या वेळी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश आले असल्यामुळे त्यांना तात्काळ रिलीव्ह करणे सोयीचे नसल्याने त्यांना थांबवून ठेवण्यात आले. दरम्यान गणेशोत्सव, मोहरम, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळी, अयोध्या निकाल या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. या सण उत्सवांना शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेरून बंदोबस्त मागवला जातो. यामुळे देखील अधिका-यांना सोडण्यात आले नव्हते. मात्र, सण, उत्सव आणि महत्वाचा बंदोबस्त संपला असल्याने ‘त्या’ अधिका-यांना आज रिलीव्ह करण्यात आले आहे.

कार्यमुक्त (रिलीव्ह) केलेले अधिकारी – सध्याची नेमणूक (बदलीचे ठिकाण)
# बिरदेव निवृत्ती काबुगडे – भोसरी पोलीस ठाणे (कोल्हापूर परीक्षेत)
# हरिदास शिवराम बोचरे – पिंपरी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, ठाणे शहर)
# निलेश एकनाथ बोडखे – सायबर कक्ष (नाशिक परिक्षेत्र)
# भरत विठ्ठलराव चपाईतकर – चिखली पोलीस ठाणे (अमरावती परिक्षेत्र)
# योगेश भास्कर शिंदे – चिखली पोलीस ठाणे (औरंगाबाद परिक्षेत्र)
# विवेक सुरेश वल्टे – हिंजवडी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, ठाणे शहर)
# मनोज मोहन पवार – देहूरोड पोलीस ठाणे (कोल्हापूर परिक्षेत्र)
# श्रीकांत अंकुश पाटील – सांगवी पोलीस ठाणे (नाशिक परिक्षेत्र)
# अमित बाळासाहेब शेटे – वाकड पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)
# सुधीर योगीराज पाटील – सांगवी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, नाशिक शहर)
# ईश्वर धुराजी जगदाळे – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त नागपूर शहर)
# सचिन विजय शिंदे – नियंत्रण कक्ष (कोल्हापूर परिक्षेत्र)
# रत्नमाला त्रिंबकराव सावंत – चिखली पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, मुंबई शहर)
# रुपाली निवास पाटोळे – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, मुंबई शहर)
# श्रीकांत तानाजी शेंडगे – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
# वसंत शेषराव मुळे – आर्थिक गुन्हे शाखा (नांदेड परिक्षेत्र)
# हनुमंत प्रकाश बांगर – वाकड पोलीस ठाणे (पोलीस आयुक्त, मुंबई शहर)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.