Chinchwad: काळेवाडी, चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. काळेवाडी, चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज (बुधवारी) धडक कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील काळेवाडीतील नवीन बीआरटी परिसरातील डीपी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे झाली होती.

  • बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 15 क्षेत्रफळ अंदाजे 1521.00 चौरस फुट बांधकामावर कारवाई केली. ही कारवाई दोन जेसीबी, एक डम्पर, 10 मजूर, ब्रेकर आणि महापालिकेचे 10 पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचबरोबर चिंचवड येथील 12 चालू असलेली आरसीसी बांधकामे भुईसपाट केली. त्यामध्ये वाल्हेकरवाडी मोरया हाऊसिंग सोसायटी येथील 8 व स्वामी विवेकानंद हौसिंग सोसायटी येथील 4 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

  • कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांचे पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.