Chinchwad : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये; फडणवीसांकडून संकेत

एमपीसी न्यूज : मागील वर्षभरापासून संपूर्ण राज्यातील बड्या (Chinchwad) शहराच्या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत. कोरोना काळात मुदत संपल्यानंतर अनेक महानगरपालिकाची निवडणूक झालीच नाही. अशा महापालिकांवर सध्या प्रशासक राज आहे. महापालिकेच्या या निवडणुका कधी होणार याची अनेकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिका निवडणुकांबाबत एक मोठे विधान केले आहे.

येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका या वेळेवर होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका प्रचंड मतांनी जिंकू असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यात सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल लागेल आणि ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Baramati : माझ्या लग्नात गोंधळ घाला; गौतमी पाटीलचे पत्रकारांना उत्तर

दरम्यान पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या घर चलो या संपर्क अभियानाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असा टोलाही विरोधकांना लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.