Chinchwad : एकतर्फी प्रेमातून महिलेचा चाकूने वार करून खून

हल्लेखोर तरुणाने स्वतःवरही चाकूने वार केले. त्यात तो जखमी झाला. : Murder by stabbing a woman out of one-sided love

0

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून शेजारी राहणाऱ्या तरुणाने महिलेचा चाकूने वार करून खून केला. तसेच स्वतःवरही वार करून घेतले. ही घटना आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

राणी सतीश लांडगे (वय.29, रा. अजंठानगर, चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अरविंद शेषराव गाडे (वय.30, रा. अजंठानगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली.

अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तसेच तो फोन वरून राणी यांना संपर्क करायचा. त्यामुळे राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते.

मात्र, अरविंद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता व तो वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मागील महिन्यात मोबाईल क्रमांक बदलला होता.

त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने राणी यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला व स्वतःवरही वार करून घेतले.

जखमी अरविंदवर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like