Pimpri News : फायरिंग व धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करणारी टोळी बारा तासात जेरबंद

एमपीसी न्यूज : पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत परशुराम चौक, रामनगर चिंचवड येथे शुक्रवार 2 डिसेंबर रोजी सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच (Pimpri News) व्यावसायिक वादातून कट रचून गावठी हट्टा व धारदार शस्त्राने विशाल गायकवाड या तरुणावर हल्ला करून त्याचा निघृण खून करण्यात आला. या प्रकरणी पिंपरी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत हल्लेखोरांना अटक केले आहे. 

या प्रकरणी अर्जून गायकवाड, वय 32 वर्षे, रा. मोरे वस्ती, चिखली यांनी फिर्याद दिली होती. त्यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत भा.द.वि कलम  302, 143, 147, 148, 149, आर्म ॲक्ट कलम 3 व 7 अन्वये 3 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यामध्ये अरोपी बाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड येथील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे सात पुरुष व एक महिला आरोपींना बारा तासांच्या आत अटक करण्यात आली असून (Pimpri News) दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील अपराध सिद्धी करण्याच्या अनुषंगाने सखोल तपास चालू आहे.

Pune News : पुणे-अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या

या गुन्ह्याचा तपास अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, विवेक पाटील, पोलीस आयुक्त परिमंडळ एक, पिंपरी-चिंचवड, प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी भोजराज मिसाळ, पोलीस निरीक्षक( गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.