Chinchwad : “गझलपुष्प’तर्फे आयोजित मुशायरा चिंचवडमध्ये रंगला

एमपीसी न्युज – प्रेम आणि भावनांचा उत्कट अविष्कार सादर करीत एकापेक्षा एक सरस गझलांच्या सादरीकरणातून चिंचवडमध्ये मराठी गझल मुशायरा रंगला. निमित्त होते “गझलपुष्प’तर्फे आयोजित मुशायऱ्याचे.

चिंचवड गावातील सिल्व्हर गार्डन सोसायटीतील खुशबू सभागृहात मुशायरा रंगला. उद्योजक अभय पोखर्णा, प्रवीण पोखर्णा, मीना पोखर्णा, ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी विधाटे, समरसता साहित्य मंचच्या शोभा जोशी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II
  • “मला जोडायचे नाही, तुला तोडायचे नाही, असे अद्वैताचे नाते कुणा समजायचे नाही’, अशा शब्दांत अभिजित काळे यांनी मुशायऱ्याला सुरवात केली. रघुनाथ पाटील यांनी “भेटली माझी प्रिया अन्‌ शांत झाली वादळे…’ असे म्हणत प्रेमाचा रंग भरला.

समृद्धी सुर्वे, अशोक कोठारी (शत्रू समोर असता, एकी हवी नव्याने), भाग्यश्री कुलकर्णी (प्रेमाने मन तुडुंब भरले…), राज अहेरराव (बंदिस्त भावनांना शब्दात मुक्त केले), मीना शिंदे (गोठलेल्या भावनांना पूर येता, आसवांचा इथे सत्कार झाला…) यांनी रचना सादर केल्या. मराठी गझल लेखनाची वाटचाल सादर करीत दिनेश भोसले यांनी बहारदार निवेदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.